आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:मंगळवारी 8,336 नवीन रुग्णांची नोंद तर 246 मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 3.27 लाखांवर

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात 639 नवे रुग्ण, आमदार राजूरकर कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात मंगळवारी(दि.21) 8,336 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील एकूण रुग्णसंख्या 3 लाख 27 हजार 31 झाली आहे. तसेच, आतापर्यंत राज्यात 12,276 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1,32,236 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1,82,217 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सांगलीमध्ये 22 जुलै ते 30 जुलैपर्यंत लॉकडाउन 

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमिवर सांगलीमध्ये 22 जुलैच्या रात्री दहा वाजेपासून 30 जुलैपर्यंत लॉकडाउन लावण्यात आला आहे. पालकमंत्री जयंत पाटिल यांनी याबाबत माहिती दिली. 

शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे कोरोनामुळे निधन

पुण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनासोबतच इतर आजारांनी ग्रासलेल्या मारटकर यांनी मंगळवारी सायंकाळी केईएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 

राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परभणी येथील राज्यसभा खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. फौजिया खान यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाजवळचा परिसर सील करण्यात आला आहे. यासोबतच, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचीही तपासणी केली जाणार असल्याचे परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले आहे. दरम्यान अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्या आहे. आता राष्ट्रवादीचे परभणी जिल्ह्याध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यापाठोपाठ येथील खासदारही कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. 

शिवसेना आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आला. गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी कोकणात निघालेले आहेत. दरम्यान आमदाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. 

काँग्रेस आमदार अमर राजूरकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह

काँग्रेस आमदार अमर राजूरकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राजूरकर यांची हजेरी असल्याने नांदेडचे जिल्हा प्रशासन होम क्वॅारंटाइन झाले आहे. 

'बनवा बनवी थांबा आणि खासगी रुग्णालयातील अव्वाच्या सव्वा बिलांविरोधात कारवाई करा'- किरीट सोमय्या

याच काळात खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात आहे. डॉक्टरांकडून रुग्णांची लूट केली जात आहे. सामन्य रुग्णांना हे परवडणारे नाही. राज्यातील सर्वच शहरांमध्ये रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात बिल आकारलं जात आहे. याविरोधात आता भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

किरीट सोमय्या यांनी लिहिले की, मी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महापालिका आयुक्तांना विनंती करतो की, ही बनवा बनवी थांबवा आणि खासगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बिल आकराणाऱ्यांविरोधात प्रत्यक्ष कृती करा. महाराष्ट्र सरकारला आणि महापालिकेला  चांगल्या प्रकारे माहिती आहे की, त्यांनी फक्त बेड चार्जेस निश्चित केले आहेत. खासगी रुग्णालयांना अपारदर्शक, अव्वाच्या सव्वा बिल आकारायला मुभा दिली आहे, त्यांनी आदेशात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...