आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 14.31 लाख कोरोनामुक्त! एकूण रुग्णसंख्या 16.25 लाख, बळींचा आकडा 42,831, रिकव्हरी रेटही 88.1 टक्क्यांवर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी 7,539 नव्या रुग्णांचे निदान तर 198 मृत्यूची नोंद

राज्यात गुरुवारी दिवसभरात १६,१७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १४ लाख ३१,८५६ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. राज्याचा रिकव्हरी रेटही ८८.१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, गुरुवारी ७,५३९ नव्या रुग्णांचे निदान तर १९८ मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता १६ लाख २५,१९७ तर बळींचा आकडा ४२,८३१ वर गेला आहे. राज्यात सध्या १ लाख ५०,०११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्युदर २.६४ टक्क्यांवर गेला आहे.

औरंगाबाद : रुग्णसंख्येत घट
जिल्ह्यात गुरुवारी २१९ रुग्ण, तर चौघांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या ३७,१०४, बळींचा आकडा १०४७ झाला. गुरुवारी २१९ जण कोरोनामुक्त होऊ घरी परतले. आजवर ३४,५०८ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. १५४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.