आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 42 हजारांच्या पुढे, तर 208 रुग्णांचा मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,890 नवीन कोरोना संक्रमित सापडले आहेत, तर 208 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 72 मृत्यू 48 तासातील असून, 136 काही दिवसांपूर्वीचे आहेत. राज्यात आतापर्यंतर 6 हजार 739 रुग्णांचा बळी गेला आहे. सध्या राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा 1 लाख 42 हजार 900 झाला आहे, तर सध्या राज्यात 62,354 अॅक्टिव रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या रिपोर्टनुसार, राज्यात 73,792 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, एकट्या मुंबईत कोरोना संक्रमितांची संख्या 69,528 झाली आहे. तर 3, 964 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 37,008 रुग्णांना ठीक झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात 28,548 अॅक्टिव कोरोना रुग्ण आहेत.

बातम्या आणखी आहेत...