आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात विक्रमी 31,855 नवे रुग्ण; बीड, परभणीसह नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन, मराठवाड्यात 4672 नवे रुग्ण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात बुधवारी विक्रमी ३१,८५५ नवे रुग्ण वाढले. दुसरीकडे दिवसभरात १५,०९८ रुग्ण बरे हाेऊन घरीही परतले. ९५ नव्या मृत्यूंसह एकूण मृतांचा आकडा ५३,६८४ वर पोहोचली आहे. एकूण काेरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ लाख ६४,८८१ वर पोहोचली आहे. त्यापैकी २२ लाख ६२,५९३ जणांनी काेरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.२१ टक्क्यांवर आले आहे. राज्याचा मृत्यूदर २.०९% इतका आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा २ लाख ४७,२९९ वर पोहोचला आहे.

विदर्भात ७०३१ पॉझिटिव्ह
अमरावती | विदर्भात बुधवारी कोरोनाचे ७०३१ नवे रुग्ण, तर ६५ जणांचा मृत्यू झाला. यात पूर्व विदर्भातील मृतांची संख्या ४५ आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात ४० जणांचा मृत्यू झाला.

बीड, परभणीसह नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन, मराठवाड्यात ४६७२ नवे रुग्ण
रुग्णांची संख्या वाढत असल्याने परभणी, नांदेड, बीड जिल्ह्यांत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. नांदेडमध्ये २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत परभणीत २४ मार्च ते १ एप्रिलपर्यंत व बीडमध्ये २६ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान लॉकडाऊन असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक बहुतांश ठिकाणी बंद असेल. परभणीत केवळ अत्यावश्यक सेवा व वाहतूक सुरू आहे. नांदेडमध्ये मद्यविक्री, जिल्ह्यांतर्गत बससेवा बंद राहील. बीड जिल्ह्यात सीमा बंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. दरम्यान, मराठवाड्यात बुधवारी ४६७२ नवे रुग्ण तर, ५२ जणांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...