आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात रविवारी 9,431 रुग्णांची नोंद, तर 267 जणांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 3 लाख 75 हजार पार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचा रिकव्हरी रेट 56.74 टक्क्यावर

राज्यात रविवारी 9 हजार 431 नवीन रुग्णांची नोंद तर 267 जणांचा मृत्यू झाला. यासोबत राज्यातील रुग्णसंख्या 3,75,799 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 1 लाख 48 हजार 601 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत 2 लाख 13 हजार 238 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 56.74 टक्क्यावर पोहचला आहे.

राज्यात काल दिवसभरात 9 हजार 251 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली तर 257 बळी गेले आहेत. शनिवारी 7,227 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले.

औरंगाबाद ६, नांदेड दोन तर जालना,उस्मानाबादेत प्रत्येकी १ बळी
औरंगाबाद - मराठवाड्यात शनिवारी ४८६ नवे कोरोना रुग्ण आणि १० मृत्यूंची नोंद झाली. यात औरंगाबाद जिल्ह्यात २३७ नवे रुग्ण तर ६ मृत्यूंची नोंद झाली. जालना जिल्ह्यात ६८ पॉझिटिव्ह आढळले तर एकाचा मृत्यू झाला. बीड ४४, हिंगोली जिल्ह्यात २३ अहवाल पॉझिटिव्ह आले. उस्मानाबाद जिल्ह्यात एकाचा मृत्यू तर १४ अहवाल पॉझिटिव्ह आले. नांदेड जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू तर ८३ अहवाल पॉझिटिव्ह आले. परभणी जिल्ह्यात १७ अहवाल पॉझिटिव्ह आले. जालना जिल्ह्यात आता एकूण १७६४ रुग्णसंख्या झाली असून यापैकी १,१५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या िवलगीकरण कक्षात ४७९ जण उपचार घेत आहेत.

बीड जिल्ह्यातील बाधितांची संख्या पाचशे पार झाली आहे. एकूण बाधितांचा आकडा ५११ इतका झाला आहे. हिंगोली येथील विलगीकरण कक्षात मृत्यू झालेल्या ८० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण ५५६ रुग्ण असून त्यापैकी ३५८ रुग्ण बरे झाले आहेत, तर १९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात एकूण ४९८ रुग्ण असून २३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २१ बाधित मृत्युमुखी पडले. नांदेड जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,२५२ झाली आहे.