आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात सोमवारी 7924 नवे रुग्ण, 8,706 बरे होऊन घरी परतले; रिकव्हरी रेट 57.84 टक्के

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात आज 227 जणांचा मृत्यू, राज्यातील कोरोना मृत्यू दर 3.62 टक्के

राज्यात सोमवारी 7924 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात 8,706 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दिवसभरात 227 बाधितांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 3 लाख 83 हजार 723वर गेली असून 2 लाख 21,944 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 57.84 टक्के झाले आहे. सध्या 1 लाख 47 हजार 637 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मृतांची एकूण संख्या 13,833 झाली आहे.

पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे पॉझिटिव्ह

पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाचे निदान झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून ते मुंबईत कामानिमित्त आले असून त्या वेळी संसर्ग झाल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांच्यावर मुंबईतच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलीकडेच त्यांनी लातूर, उस्मानाबाद, उदगीर येथे बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे संपर्कात आलेल्या लोकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.