आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात मंगळवारी 7,717 नवीन रुग्णांची नोंद, तर 10,333 रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी 282 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

राज्यात मंगळवारी 7,717 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर चांगली बाब म्हणजे 10,333 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यादरम्यान, 282 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. सध्या राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 3 लाख 91 हजार 440 झाला आहे. यातील 2 लाख 32 हजार 277 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 1,44,694 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मंगळवारी राज्यभरात 44 हजार चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

मुंबईत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 20 % कमी झाला

मुंबईत कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यान कमी झाला आहे. म्हणजेच, आता प्रत्येक 100 सँपलच्या टेस्टिंगनंतर फक्त 20 लोक पॉझिटिव्ह आढळत आहेत. बीएमसीने सांगितल्यानुसार, कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या आकड्यात कपात झाली आहे.

उद्धव ठाकरेंनी हॉस्पीटलसाठी केंद्राकडे मदत मागितली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईजवळ एक स्थायी कोरोना हॉस्पीटल आणि संशोधन केंद्र उभारण्यासाठी केंद्राकडे मदत मागितली आहे. ठाकरेंनी नोएडा, मुंबई आणि कोलकातामध्ये कोव्हिड-19 केंद्रांच्या डिजिटल उद्घाटनादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मदत मागितली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकललं,

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. रुग्ण संख्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. याचा परिणाम सामान्य नागरिकांसोबतच राजकारणातील घडामोडींवरही झाला आहे. यामुळे पावसाळी अधिवेशन हे पुढे ढकलण्यात आलेलं होतं. मात्र आता अजून एकदा हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. 7 सप्टेंबरपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी माहिती दिली आहे.

इच्छेनुसार कोरोना चाचणी करा, मुंबईकरांसाठी अदित्य ठाकरेंची घोषणा

आता कोरोना संसर्ग झाल्याची शंका असणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला आपल्या शंकेचे समाधान करता येणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी इच्छा असेल त्या प्रत्येक मुंबईकरांना कोरोना चाचणी करण्याची मुभा असल्याचे जाहीर केले आहे.

‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांनाही 50 लाखांचे विमा संरक्षण

कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षारक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आणि सुरक्षारक्षकांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच उपलब्ध होणार आहे तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून रेल्वेतून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

गरोदर महिलेच्या पोटातील बाळाला कोरोनाची लागण

कोरोना महामारीच्या विस्ताराबाबत दररोज नवीन रिसर्च समोर येत आहेत. यादरम्यान पुण्यातील ससून जनरल हॉस्पीटलने दावा केला आहे की, येथील एका गरोदर महिलेच्या पोटातील बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. महिलेल्या डिलीव्हरीच्या एका महिन्या आधी ताप आली होती, नंतर डिलीव्हरी झाल्यावर बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

व्हर्टिकल ट्रांसमिशनचे पहिलेच प्रकरण

हॉस्पिटलने सांगितल्यानुसार, बाळाला प्लेसेंटाच्या माध्यमातून कोरोना संक्रमण झाले आहे. हे कोरोना व्हायरस व्हर्टिकल ट्रांसमिशनचे देशातील पहिलेच प्रकरण आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, बाळ गर्भाशयात असताना संक्रमण झाल्यास, याला व्हर्टिकल ट्रांसमिशन म्हणतात. संक्रमित आईकडून प्लेसेंटाच्या माध्यमातून व्हायरस गर्भातील बाळाला झाला.

कोविड क्वारंटाईन कक्षात फुटबॉल खेळणे पडले महागात

पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील एकलव्य अलगीकरण कक्षात फुटबॉल खेळणार्या कोरोना बाधितांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि विनामास्क फुटबॉल खेळणार्या कोरोना बाधितांवर गुन्हा नोंद झाला.एकलव्य कोव्हिड काळजी केंद्राचे समन्वय अधिकारी प्रविण राव यांनी याबाबत फिर्याद दाखल केली.