आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, 167 बाधितांचा मृत्यू

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गरिबांनी रुग्णालयात भरती होण्यापूर्वी उत्पन्नाचे प्रमाणपत्र देणे अपेक्षित नाही

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले. दिवसभरात ५,३१८ रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील रुग्णांचा एकूण आकडा १ लाख ५९,१३३ वर गेला आहे. शनिवारी १६७ मृतांसह बळींचा एकूण आकडाही ७,२७३ वर गेला आहे. नव्या मृत्यूंपैकी ८६ मृत्यू हे गेल्या ४८ तासांतील, तर उर्वरित ८१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत.

शनिवारी एकूण ४,४३० रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांचा आकडा ८४,२४५ वर गेला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४% आहे. आता ६७,६०० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना मृत्युदर ४.५७% झाला आहे.

औरंगाबाद: २४४ रुग्णांची भर

औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे २४४ रुग्ण आढळले तर ५ जणांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या ४,७६६ झाली आहे. एकूण मृत्यू २३८ झाले आहेत. आजपर्यंत २,४४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या २,०८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नांदेड : आमदार मोहन हंबर्डेंसह कुटंुबातील ९ जणांना कोरोना

नांदेड जिल्ह्यात १६ नवे रुग्ण आढळले आहेत. नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या कुटुंबातील ९ जणांना बाधा झाली आहे. जालना जिल्ह्यात १५, हिंगोलीत २ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात २९ नवे रुग्ण, तर ७० वर्षीय रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला.

गरिबांनी रुग्णालयात भरती होण्यापूर्वी उत्पन्नाचे प्रमाणपत्र देणे अपेक्षित नाही

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी उत्पन्नाचे प्रमाणपत्र देणे अपेक्षित नाही, असे निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदवले आहे. अशा रुग्णांकडून आकारलेले १० लाख ६,२०५ रुपये कोर्टात जमा करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने शीव येथील के. जे. सोमय्या रुग्णालयाला दिले आहेत.

‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तहसीलदार, सामाजिक कल्याण अधिकाऱ्याकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवून ते रुग्णालयात देणे अपेक्षित नसते, असे म्हणत कोर्टाने रुग्णालयाला २ आठवड्यांत रक्कम न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करण्याचे निर्देश दिले.

बातम्या आणखी आहेत...