आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या साडेपाच लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. शुक्रवारी राज्यात ११,६०७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. आता एकूण कोरोनामुक्तांचा आकडा ५ लाख ४३,१७० वर गेला आहे. आता राज्यात १ लाख ८०,७१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, शुक्रवारी १४,३६१ नवे रुग्ण तर, ३३१ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. आता राज्यातील एकूण रुग्णसंख्या ७ लाख ४७,९९५ तर बळींचा आकडा २३,७७६ वर पोहोचला आहे.
मराठवाड्यात कोरोनाचे २८ बळी
औरंगाबाद | शुक्रवारी मराठवाड्यात २८ रुग्णांचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात ७, नांदेड ५, परभणी जिल्हा ५ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात २ रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, रुग्णसंख्येतही मोठी भर पडली आहे. नांदेड २१५, हिंगोली ३९, परभणी ८१, जालना ६१, लातूर २६८ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ८० रुग्ण आढळले.
औरंगाबाद : ३६४ रुग्ण, नऊ मृत्यू
जिल्ह्यात शुक्रवारी ३६४ नवे रुग्ण, तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्याची रुग्णसंख्या २२,५४९ झाली असून त्यापैकी १७,२२४ जण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६८१ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. सध्या ४ हजार ६४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.