आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात शनिवारी सर्वाधिक 7,074 रुग्णांची भर, तर 295 जणांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 2 लाख पार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात सध्या 83,295 अॅक्टीव्ह रुग्ण
Advertisement
Advertisement

राज्यातील कोरोनाबाधितांनी 2 लाखाचा आकडा पार केला. राज्यात आज कोरोनाचे सर्वाधिक 7,074 नवीन रुग्ण आढळले. तर 295 जणांचा मृत्यू झाला. यासोबत राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 64 झाली आहे. तर आजपर्यंत 8,671 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 83,295 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. 

राज्यात शुक्रवारी विक्रमी ६,३६४ नवे रुग्ण, तर १९८ मृत्यूंची नोंद झाली. रुग्णांचा एकूण आकडा १ लाख ९२,९९० तर बळींची संख्या ८,३६७ वर गेली आहे. गुरुवारी ३,५१५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांचा एकूण आकडा १ लाख ४,६८७ वर गेला.

मराठवाड्यात कोरोनाचे १५ बळी, ३०३ नवे रुग्ण

मराठवाड्यात कोरोनाने शुक्रवारी १५ बळी घेतले. औरंगाबाद १०, नांदेड १, लातूर १ तर जालन्यात ३ जणांचा मृत्यू झाला. मराठवाड्यात ३०३ नवे रुग्णही वाढले. औरंगाबाद जिल्हा २२१, जालना ३०, परभणी ७, नांदेड १६, बीड २, लातूर ८, उस्मानाबाद ७, हिंगोलीत १२ रुग्णांचा समावेश आहे.

शुक्रवारी जालन्यात अनुक्रमे ६५, ६० व ८५ वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाला. नांदेडमध्ये ५२ वर्षीय महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात उदगीर येथील एका ६८ वर्षीय महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला.

औरंगाबादेत २२१ नवे रुग्ण

जिल्ह्यात शुक्रवारी २२१ रुग्ण तर १० बळींची नोंद झाली. १५६ रुग्ण शहरातील, तर ६५ ग्रामीण भागातील आहेत. एकूण रुग्णसंख्या ६२६४, बळींची संख्या २८९ वर गेली. ३१२६ जण काेराेनामुक्त झाले आहेत.

Advertisement
0