आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 20 हजार 489 नवे कोरोना रुग्ण, तर 312 जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या 8 लाख 83 हजार 862

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात सध्या 2 लाख 20 हजार 661 रुग्णांवर उपचार सुरु

राज्यात शनिवारीही रुग्णवाढीने नवा उच्चांक नोंदवला. दिवसभरात 20 हजार 489 नवे रुग्ण तर 312 मृत्यूंची नोंद करण्यात आली. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता 8 लाख 83 हजार 862, तर बळींचा आकडा 26,276 वर गेला आहे. राज्यात सध्या 2 लाख 20 हजार 661 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 6,36,574 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबई महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक आणि अधिष्ठाता यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्रासाठी पुढचे तीन महिने धोक्याचे असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. लोकांनीही निष्काळजीपणा न दाखवता जागरूक राहावे. त्यामुळे कोरोनाचे संकट आपण रोखू शकतो असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser