आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 15.62 लाख रुग्ण कोरोनामुक्त! रिकव्हरी रेट 91.35 टक्क्यांवर पोहोचला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात सध्या 1 लाख 2,099 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत

राज्यात आतापर्यंत तब्बल १५.६२ लाख रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. राज्यातील काेरोनामुक्तांचा एकूण आकडा १५ लाख ६२,३४२ वर पोहोचला. शुक्रवारी ११,०६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता राज्याचा रिकव्हरी रेट ९१.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, शुक्रवारी ५,०२७ नव्या रुग्णांचे निदान झाले. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १७ लाख १०,३१४ वर पोहोचली आहे. शुक्रवारी १६१ जणांचा मृत्यू झाल्यानंतर कोरोनाबळींचा एकूण आकडा ४४,९६५ वर पोहोचला आहे. राज्याचा मृत्युदर २.६३% आहे. राज्यात सध्या १ लाख २,०९९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यभरात ९३ लाख १८,५४४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी १८.३५% जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.