आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात आतापर्यंत तब्बल १७.५३ लाख रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. राज्यातील काेरोनामुक्तांचा आकडा १७ लाख ५३,९२२ वर पोहोचला आहे. शनिवारी ३,९४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, राज्यात शनिवारी दिवसभरात ४,२५९ नव्या रुग्णांचे निदान करण्यात आले. यासोबतच राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १८ लाख ७६,६९९ वर पोहोचली आहे. शनिवारी ८० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर कोरोना बळींचा एकूण आकडा ४८,१३९ वर पोहोचला आहे. राज्याचा मृत्युदर २.५७% आहे. राज्यात आज घडीस ७३,५४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.