आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:17 महिन्यांनंतर राज्यात प्रथमच नव्या रुग्णांचा आकडा 1 हजार 737 वर

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 16 मे 2020 ला 1606 आढळले होते नवे कोरोना रुग्ण

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात तब्बल १७ महिन्यांनंतर सोमवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या १,७३७ वर आली आहे. मृतांची संख्याही ३६ इतकीच आहे. राज्यात १६ मे २०२० ला १,६०६ नवे रुग्ण आढळले होते. आता राज्यातील एकूण रुग्णसंख्या ६५ लाख ७९,६०८ तर बळींचा आकडा १ लाख ३९,५७८ वर पोहोचला आहे.

आजवर ६४ लाख ४,३२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रविवारच्या तुलनेत नव्या रुग्णांत ५५० पेक्षा जास्त रुग्णांची घट झाली. रविवारची सुटी आणि सोमवारी महाराष्ट्र बंदमुळे कोरोना चाचण्याही १ लाखापर्यंतच झाल्या. यामुळे नव्या रुग्णांचा आकडा घटला आहे.

बातम्या आणखी आहेत...