आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:दिवसभरात 6 हजार 497 रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या 2 लाख 60 हजारांपार; राज्यातील रिकव्हरी रेट 55.68 टक्के

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 44 हजार 507 जण कोरोनामुक्त

राज्यात आज दिवसभरात 4 हजार 182 रुग्णांना घरी सोडले. राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 44 हजार 507 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, राज्यात सोमवारी 6 हजार 497 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. यामुळे एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 60 हजार 940 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 5 हजार 637 रुग्ण उपचार घेत आहेत, तर दिवसभरात 193 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 10 हजार 482 वर गेली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) वाढले असून सोमवारी तो 55.68 टक्के झाला.

मुंबईतील रुग्णसंख्या 92 हजार पार, ठाण्यातही रुग्णांची झपाट्याने होतीये वाढ

मुंबई आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 92,988 झाली आहे. यातील 64,872 जण बरे झाले असून 5288 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई सद्या 22,540 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईजवळील ठाणे शहरातही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. येथील रुग्णसंख्या 61,869 झाली आहे. यातील 1646 रुग्णांचा मृत्यू झाला. 

पुण्यात आज रात्रीपासून कडक लॉकडाउन

पुण्यात आज रात्री 12 वाजेपासून दहा दिवसांसाठी कडक लॉकडाउन सुरू होत आहे. त्याआधी भाजी मंडईत खरेदीसाठी लोक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशांतर हा लॉकडाउन लावण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात मागील 24 तासांत कोरोनाचे सर्वाधिक 1,088 रुग्ण आढळले. यासोबत येथील रुग्णसंख्या 38,502 वर पोहचली. प्रशासनाने कंटेनमेंट झोनवरील नियम अधिक कडक करुन लोकांना आपत्कालीन सेवेमध्येच बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत.

ठाण्यात लॉकडाउन एक आठवडा वाढविण्यात आला

ठाण्यात 19 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे केवळ औषधे व दुधाची विक्री करण्यास परवानगी आहे. ठाणे नगरपालिका प्रशासनाच्या मनपा प्रभाग समितीने रविवारी हे आदेश काढले. शिवाजी नगर, गणेश नगर, साईनाथ नगर आणि मिसळवाडी येथे . पुढील आदेश येईपर्यंत सर्व कामांवर बंदी घालण्यात आली आहे.

खासगी शिक्षकांना कोरोना सर्व्हेच्या कामाला लावले 

भिवंडीत महानगर पालिकेच्या यादीमध्ये समाविष्ट खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना सर्वेक्षण करणे अनिवार्य केले आहे. यादरम्यान गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. 

धारावीनंतर आता मुंबईच्या या भागांवर पालिकेचे लक्ष

धारावीत यश मिळाल्यानंतर बीएमसीने आता मुंबईतील बोरीवली, दहिसर, कांदिवली आणि मलाडवर लक्ष केंद्रीत केले आहे. याठिकाणी अनेक दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. यानंतर बीएमसीने डोर-टू-डोर स्क्रीनिंगचे काम सुरू केले. बीएमसीचे कर्मचारी विविध इमारती आणि सोसायटींच्या सदस्यांसोबत बैठक घेत आहेत. या सर्व भागात फीव्हर क्लिनिक स्थापन करण्यात आले आहे. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser