आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:पुन्हा कोरोनामुक्तांचा विक्रम; दिवसभरात 23,501 रुग्ण बरे, मराठवाड्यात 1445 नवे रुग्ण, 50 मृत्यू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात शनिवारीही कोरोनामुक्तांच्या संख्येने नवा विक्रम केला. दिवसभरात तब्बल २३ हजार ५०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ८ लाख ५७,९३३ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ७२.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, दिवसभरात २१,९०७ नवे रुग्ण, तर ४२५ मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ११ लाख ८८,०१५, तर बळींचा आकडा ३२,२१६ वर गेला आहे. राज्यात सध्या २ लाख ९७,४८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मराठवाडा : १४४५ नवे रुग्ण, ५० मृत्यू
औरंगाबाद | मराठवाड्यात शनिवारी १४४५ नवीन रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ५० जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात एकाच दिवसात १५ जणांचा मृत्यू झाला.
- रुग्ण : औरंगाबाद जिल्ह्यात ३२३, जालना १२६, बीड १५५, हिंगोली ६९, नांदेड ३३२,लातूर २८५, परभणी १०८, उस्मानाबादेत २१६ रुग्ण आढळले.
- मृत्यू : औरंगाबाद ६, जालना २, बीड ३, हिंगोली १, परभणी ३, लातूर ११, नांदेड ७, तर उस्मानाबाद जिल्ह्यात काेराेनामुळे १५ जणांचा मृत्यू झाला.