आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:गंभीर रुग्णांसाठी टेली आयसीयू सेवा सुरू, राज्यातील रिकव्हरी रेट 50.04% तर मृत्यूदर 4.67%; सुमारे 4 हजार पोलिसांना लागण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत अनलॉक झाल्यानंतर आता रस्त्यांवरील दुकानेही सुरू झाली आहेत. दुकानातून मास्क विकत घेताना एक माणूस. - Divya Marathi
मुंबईत अनलॉक झाल्यानंतर आता रस्त्यांवरील दुकानेही सुरू झाली आहेत. दुकानातून मास्क विकत घेताना एक माणूस.
  • राज्यात आतापर्यंत 64,153 रुग्णांचा कोरोनावर मात

राज्यातील कोरोना साथरोगाची परिस्थिती चिंताजनक होत असून शनिवारी एकाच दिवसात सर्वाधिक 3 हजार 874 नवे रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढण्याचे ही पहिलीच वेळ आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 1 लाख 28 हजार 205 झाली आहे. यापैकी सध्या 58 हजार 54 रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 50 टक्क्यांवर गेले आहे, ही दिलासादायक बाब आहे. शनिवारी 1380 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण 64 हजार 153 रुग्ण बरे झाले आहेत.

शनिवारी राज्यात 160 रुग्णांचा मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील बळींची संख्या सहा हजारांजवळ म्हणजे 5984 वर गेली आहे. मृत्यूचे प्रमाण 4.67 टक्के झाले आहे. आतापर्यंत एकूण 5 हजार 984 कोरोनाग्रस्ताचा बळी गेला आहे.

गंभीर रूग्णांसाठी टेली आयसीयू सेवा सुरू करणार

आयसीयूत उपचार सुरू असलेल्या कोरोनाग्रस्तांसाठी विशेष डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शनाची गरज पूर्ण करण्यासाठी सरकार टेली आयसीयू सेवा सुरू करणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले - सध्या मुंबईसह राज्यातील सात जिल्ह्यांत प्रायोगित तत्वावर ही सेवा दिली जाईल. ठाणे, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, अकोला आणि जालना जिल्ह्यांत देखील ही सेवा दिली जाईल. टोपे यांच्यानुसार, राज्यातील 75 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. 10 ते 15 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत. गंभीरपणे आजारी 3 टक्के रूग्णांना आयसीयूमध्ये उपचार घेण्याची आवश्यकता आहे. या रुग्णांच्या जीवाला मोठा धोका आहे, त्यामुळे आयसीयूमधील तज्ञांची संख्या वाढवली जात आहे. या प्रयत्नात, डॉक्टरांच्या फाऊंडेशन मेडीस्केपेने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून टेली आयसीयू तंत्रज्ञानाचा प्रयत्न करण्याचा प्रस्ताव सरकारला दिला होता, याला सरकारने मान्यता दिली आहे.

50.04 टक्के रिकव्हरी रेट, 4.67 टक्क्यांवर पोहोचला मृत्यू दर 

शनिवारपर्यंत संपूर्ण राज्यात 7, 54, 000 लोकांचे नमुने घेतले गेले. यातील 1,28,205 (17 टक्के) लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. संपूर्ण राज्यात सुमारे 5,94,719 लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आला आहे. 25,099 लोकांना संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे. राज्यात शनिवारपर्यंत रिकव्हरी 50.04 टक्के सांगण्यात आला तर राज्यातील मृत्यू दर 4.67 टक्के आहे.  

सुमारे 4 हजार पोलिसांना कोरोनाची लागण 

पोलिस देखील मोठ्या संख्येने कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आतापर्यंत 3960 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली, यातील 46 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण राज्यात एकूम 2925 पोलिस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात दिली आहे. यातील काही कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले. तर 986 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 113 पोलिस अधिकारी आणि 873 शिपाई आहेत. मृतांमध्ये एक पोलिस अधिकारी आणि 45 शिपायांचा समावेश आहे. एकट्या मुंबईतच 2349 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यातील 31 जणांचा बळी गेला आहे. मागील एका आठवड्यात 9 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...