आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात सोमवारी 3721 नवे रुग्ण, तर 62 मृत्यूंची नोंद, एकट्या मुंबईतील रुग्णांचा आकडा 67 हजारांच्या पुढे

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 75 % पोलिस कोरोनामुक्त

महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांचा आकडा 1 लाख 35 हजार 796 झाला आहे. मागील 24 तासात 3,721 नवीन रुग्ण सापडले आणि 62 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 6,283 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्यार राज्यात 61 हजार 793 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून,  67 हजार 706 रुग्ण ठीक झाले आहेत. तसेच, एकट्या मुंबईत 67,586 कोरोना संक्रमित असून, 3 हजार 737 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

75 % पोलिस कोरोनामुक्त

राज्यातील जवळपास 75% कोरोना संक्रमित पोलिस ठीक झाले आहेत. राज्यातील एकूण कोरोना संक्रमित पोलिसांची संख्या 4,048  झाली आहे. यातील 3 हजार पोलिस ठीक झाले आहेत. परंतू, आतापर्यंत 46 पोलिसांचा मृत्यूही झाला आहे.

महावितरण कर्मचाऱ्यांना 30 लाख रुपयांचा विमा

राज्य सरकारने महावितरण कर्मचाऱ्यांना 30 लाख रुपयांचा विमा देण्याचे ठरवेल आहे. म्हणजेच, आता कोरोनामुळे महावितरणातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला 30 लाख रुपये मिळतील. यापूर्वी राज्य सरकारने डॉक्टर, पोलिस आणि इतर इमरजंसी सेवेतील कर्मचाऱ्यांना 50 लाख्यांच्या विम्याची घोषणा केली आहे.

बातम्या आणखी आहेत...