आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मास्क हीच लस:राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 10 हजारांवर काेराेनाबाधित! औरंगाबादेत गुरुवारपासून २५ दिवस अंशत: लाॅकडाऊन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
मास्क न घालता फिरणारे बेफिकीर औरंगाबादकर. - Divya Marathi
मास्क न घालता फिरणारे बेफिकीर औरंगाबादकर.

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस आणखी वाढत असून रविवारी सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात लसीकरणाने वेग घेतला असला तरीही रुग्णसंख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुसरीकडे, वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता औरंगाबाद शहरातही ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून रविवारी जाहीर करण्यात आले. राज्यात शुक्रवारी १० हजार २१६, शनिवारी १० हजार १८७ तर रविवारी ११ हजार १४१ कोरोनाबाधित आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

औरंगाबाद जिल्हा बंदी नाही, उद्योग, वर्तमानपत्रे, एसटी सुरू
आैरंगाबाद जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान २५ दिवस अंशत: लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आता या कालावधीत विवाह साेहळे, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास बंदी राहिल. ज्यांची लग्ने या काळात आहेत त्यांना फक्त रजिस्टर मॅरेज करण्याची मुभा असेल. जाधववाडीचा भाजीबाजारसह सर्व आठवडे बाजार सात दिवस बंद राहतील. शनिवार- रविवार हे दाेन दिवस दिवसभर बाजारपेठ पूर्णत: बंद राहील. वेरुळ- अजिंठ्यासह सर्व पर्यटनस्थळे सुरू राहतील. जिल्हाबंदी नसल्याने एसटीची सेवा सुरू राहील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

मराठवाड्यात १,१८९ बाधित, ७ मृत्यू
औरंगाबाद | मराठवाड्यात रविवारी १ हजार १८९ नवे रुग्ण आढळले. ७०६ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. एकूण ७ मृत्यू झाले असून यात औरंगाबाद जिल्ह्यात ५ तर जालना,नांदेड येथे प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. सर्वाधिक ४२६ रग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आढळले. याशिवाय जालना २१९, परभणी २०, हिंगोली ५५, नांदेड २२९, लातूर ६९, उस्मानाबाद ४९, बीडमध्ये १२२ जण पॉझिटिव्ह आढळले.

विदर्भात ३,४१८ नवे रुग्ण, २५ जणांचा मृत्यू
अमरावती | विदर्भातील ११ जिल्ह्यात रविवारी ३४१८ नवे रुग्ण आढळले, तर २५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पूर्व विदर्भात नागपूर ७ तर वर्धा जिल्ह्यातील तिघांचा आणि पश्चिम विदर्भात अमरावती ७, यवतमाळ ३, अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी दोन व वाशीम जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. एकूण ३,०६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रविवारी अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ४४६, बुलडाणा ३७९, अकोला ३४०, यवतमाळ ३०१ आणि वाशीम जिल्ह्यातील २४२ रुग्ण आढळले. विदर्भात बाधितांची एकूण संख्या ३ लाख ४३ हजार ९४७ वर पोहोचली. मृतांची एकूण संख्या ७५१३ झाली आहे.

शुक्रवार : १०,२१६ शनिवार : १०,१८७ रविवार : ११,१४१ रिकव्हरी रेट : ९३%

बातम्या आणखी आहेत...