आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना कहर:राज्यात रुग्णसंख्या 1 लाख 44,741, बळी 6931, अॅक्टिव्ह रुग्ण 63,342

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.42 टक्क्यांवर

राज्यभरात गुरुवारी रेकॉर्डब्रेक ४,८४१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही उच्चांकी २६३ रुग्णांची वाढ झाली. राज्याची रुग्णसंख्या १ लाख ४७,७४१ तर एकूण बळींची संख्या ६,९३१ वर गेली आहे. गुरुवारी ३,६३१ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांचा एकूण आकडा ७७,४५३ वर गेला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्क्यांवर पोहोचले असून ६३,३४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्युदर ४.६९ टक्के झाला आहे.

औरंगाबादेत १४ बळी

औरंगाबाद | जिल्ह्यात गुरुवारी विक्रमी १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात २६३ अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने हा रुग्णसंख्येचाही नवा उच्चांक ठरला. यापूर्वी बुधवारी सर्वाधिक २०० जण पाॅझिटिव्ह ठरले हाेते. आता जिल्ह्यातील काेराेनाबाधितांची एकूण संख्या ४२९९ तर बळींची संख्या २३३ वर पोहोचली आहे.

जालन्यात एक बळी, ९ रुग्ण : जालना जिल्ह्यात एका मृत्यूसह ९ रुग्णांची भरही पडली. परभणी जिल्ह्यात ५ तर नांदेड जिल्ह्यात ५ संशयितांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जालन्यात बुधवारी ५५ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

0