आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात गुरुवारी आढळून आले 5902 कोरोनाबाधित रुग्ण, 1 लाख 27 हजार 603 रुग्णांवर सध्या उपचार सुरु

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी राज्यात 5902 लोक संक्रमित आढळून आले. यासोबतच रुग्णांचा आकडा वाढून 16 लाख 66 हजार 668 झाला आहे. यापैकी 1 लाख 27 हजार 603 रुग्णांवर उपचार सुरु असून 14 लाख 94 हजार 809 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना संक्रमणामुळे राज्यात आतापर्यंत 43 हजार 710 लोकांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काेराेनाचे फक्त ६१८ अॅक्टिव्ह रुग्ण
औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे १३३ रुग्ण आढळले तर ३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ९१६ झाली. बळींचा आकडा १०६९ पर्यंत गेला आहे. गुरुवारी ३३६ जण कोरोनामुक्त झाले. यात मनपा क्षेत्रातील २५६ तर ग्रामीण भागातील ८० जणांचा समावेश आहे. आतापर्यंत ३६ हजार २२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या फक्त ६१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिवाण देवडी येथील ६२ वर्षीय महिला, हिलाल कॉलनीतील ६८ वर्षीय पुरुष, वानखेडेनगरातील ५२ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.