आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 16.72 लाख रुग्णांपैकी 15 लाख जणांनी कोरोनाला हरवले, रिकव्हरी रेट 89.85 टक्क्यांवर पोहोचला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाबळींचा एकूण आकडा ४३,८३७ वर, मृत्युदर २.६२ टक्क्यांवर

गेल्या महिन्यापर्यंत दररोज ३० हजारांपर्यंत नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळणाऱ्या महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल १५ लाख रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. राज्यातील काेरोनामुक्तांचा एकूण आकडा १५ लाख ३,०५० वर पोहोचला. शुक्रवारी ८,२४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता राज्याचा रिकव्हरी रेट ८९.८५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, राज्यात शुक्रवारी दिवसभरात ६,१९० नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान करण्यात आले. यासोबतच राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १६ लाख ७२,८५८ वर पोहोचली आहे. शुक्रवारी १२७ जणांचा मृत्यू झाल्यानंतर कोरोनाबळींचा एकूण आकडा ४३,८३७ वर पोहोचला आहे. राज्याचा मृत्युदर २.६२% आहे. राज्यात सध्या १ लाख २५,४१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

सध्या १ लाख २५,४१८ अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या १ लाख २५,४१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यभरात ८९ लाख ६,८२६ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी १८.७८% जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

भारतात ७४.२८ लाख कोरोनामुक्त
भारतातील काेरोनामुक्तांची एकूण संख्या आता ७४.२८ लाखांवर पोहोचली आहे. देशात एकूण ८१.३३ लाख नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर १.२१ लाख लोकांनी प्राण गमावले.