आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात गुरुवारी दिवसभरात 15 हजारांवर रुग्णांना डिस्चार्ज, एकूण रुग्णसंख्या 14.93 लाख; रिकव्हरी रेट 80.13%

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गुरुवारी 13 हजार 397 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 358 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच एकूण संक्रमितांची संख्या 14 लाख 93 हजार 884 झाली आहे. दरम्यान गुरुवारी 15 हजार 575 लोक बरे होऊन घरी गेले. यासोबत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 12 लाख 12 हजार 016 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) 80.13% एवढा आहे. राज्यातील एकूण मृतांचा आकडा 39 हजार 430 झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 41 हजार 986 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.