आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:आज 1026 नवीन रुग्णांची नोंद, तर मृतांचा आकडा 53 वर; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 24 हजार 427

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागपूरमध्ये तयार होत आहे 5000 बेड असलेले 'कोविड-19 केंद्र'
  • जास्त संक्रमण पसरलेल्या भागात होम्योपॅथीने उपचार
  • 1200 मजुरांचा ट्रेन किराया मुंबई काँग्रेसने दिला

राज्यातील कोरोनाग्रस्तांनी आजही एक हजारांचा टप्पा पार केला आहे. आज राज्यात 1026 नवीन रुग्ण सापडले असून 53 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 24 हजार 427 वर असून राज्यातील एकूण मृतांचा आकडा  921 वर गेला आहे. यात चांगली बातमी म्हणजे आज 339 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, राज्यात आतापर्यंत 5125 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइटनुसार आहे.

ऑर्थर रोड जेलमध्ये 100 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या कमेटीने राज्यातील 50 % कैद्यांना काही दिवसांसाठी सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, किती दिवसांसाठी या कैद्यांना सोडले जाईल, याबाबत कमिटीने स्पष्टता केली नाही. परंतू, राज्यातील तुरुंगात असलेल्या 35,239 कैद्यांपैकी 50 % टेम्परेरी बेल किंवा पॅरोलवर सोडले जातील.

मुंबईमध्ये कम्युनिटी ट्रांसमिशन नाही, क्लस्टर केसेज

महाराष्ट्रमध्ये कोरोनाच्या वाढत्या संक्रमणादरम्यान राज्यातील काही भागात कम्युनिटी ट्रांसमिशन असल्याचे बोलले जात आहे. परंतू, आरोग्य  विभागने याला क्लस्टर केसेज, असे नाव दिले आहे. राज्याचे सर्विलांस ऑफिसर डॉक्टर प्रदीप आवटे म्हणाले की- ‘राज्यातील काही भागात क्लस्टर केस म्हणजेच, एकाच भागातून जास्त रुग्ण आढळणे आहे. काही ठिकाणी आजारामुळे सोर्स कळत नाहीये. 

जास्त संक्रमण पसरलेल्या भागात होम्योपॅथीने उपचार होत आहे

मुंबईमध्ये वाढत्या कोरोना संक्रमणादरम्यान बीएमसीकडून नागरिकांना होमियोपॅथी औषध आर्सेनिक अलबम-30 दिली जात आहे. बीएमसीने सांगितले की, जानकांच्या सांगिण्यानंतरच या औषधाला दिले जात आहे. या औषधामुळे अनेकांना फायदा झाला आहे. महत्वाचं म्हणजे, या औषधाचे कोणतेच साइट इफेक्ट नाही. बीएमसी आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकरी डॉ. पद्मजा केसकर यांनी जास्तीत जास्त रुग्णांना आर्सेनिक अलबम-30 देण्याचे निर्देश दिले आहेत.

1200 मजुरांचा ट्रेन किराया मुंबई काँग्रेसने दिला

सोमवारी संध्याकाळी मुंबई सीएसटी रेल्वे स्टेशनवरुन 1200 मजुरांना घएऊन एक ट्रेन बिहारला गेली. या ट्रेनचा किराया मुंबई काँग्रेसने दिला आहे. अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली. ही ट्रेन मुंबई सीएसटीवरुन संध्याकाळी 5 वाजता बिहारला रवाना झाली.

एअर इंडिया पायलट्सची रिपोर्ट पहिले पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह

मुंबईमध्ये कोरोना टेस्टमध्ये चुक झाल्याचे समोर आले आहे. 10 मे रोजी एअर इंडियाच्या ज्या 5 पायलट आणि दोन टेक्नीकल स्टाफमध्ये कोरोनाची पुष्टी झाली होती, आता दुसऱ्या रिपोर्टमध्ये 4 पायलट निगेटिव्ह आले आहेत. आज इतर तिघांची रिपोर्ट येईल. शनिवारी एअरलाइनच्या 77 वैमानिकांचे परीक्षण करण्यात आले, त्यापैकी 5 जण पॉझिटिव्ह आढळले होते. सध्या या वैमानिकांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

गावातील लोक रेड झोनमधील नागरिकांना येऊ देत नाहीयेत- अनिल परब

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या जिल्हांतर्गत वाहतुक थांबवण्याप स्पष्टीकरण दिले. परब म्हणाले की, राज्यातील अनेक मजुर आणि विद्यार्थ्यांना आपल्या गावी जाण्यासाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली होती. परंतू, अनेक ठिकाणी गावातील लोक यांना गावी येऊ देत नसल्याने हा निर्णय परत घेण्यात आला.

नागपूरमध्ये तयार होत आहे 5000 बेड असलेले 'कोविड-19 केंद्र'

नागपूर महानगरपालिका कोरोना संक्रमणाशी सामना करण्यासाठी 5,000 बेड असलेले एक 'कोविड-19 केंद्र' तयार करत आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पालिकेजवळील येर्ला येथील राधा स्वामी सत्संग परिसरात विशाल 'कोविड-19 केंद्र' बनवण्यास मजुंरी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...