आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:3 दिवसांतच साडेतीनहजार रुग्ण वाढले, 114 बळी, नाशकात कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात एकूण कोरोनामुक्तांचा आकडा 3470

शुक्रवारी पुन्हा एकदा नव्या कोरोनाग्रस्तांनी एक हजारचा टप्पा पार केला. राज्यात शुक्रवारी १०८९ नवे रुग्ण, तर ३७ मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार ६३ वर गेली आहे. शुक्रवारी १६९ कोरोनाग्रस्त बरे झाले. एकूण कोरोनामुक्तांचा आकडा ३४७० वर गेला आहे.

नाशिक मध्ये कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

कोणार्क नगर येथे आढळून आलेल्या पहिल्या 51 वर्षीय कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱ्याचा आज मृत्यू झाला. नाशिक शहरातील कोरोनाचा दुसरा तर जिल्ह्यातील 20 वा मृत्यू ठरला आहे.

मुंबईत ७७ कैद्यांसह २६ कर्मचाऱ्यांना कोरोना

आर्थर रोड तुरुंगातील ७७ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शुक्रवारी त्यांना क्वॉरंटाइन करण्यासाठी इतरत्र हलवण्यात आले आहे. तुरुंगातील कोरोनाबाधित कूकच्या संपर्कात आल्यामुळे या कैद्यांना बाधा झाली. तुरुंगातील २६ कर्मचाऱ्यांनाही कोरोना झाला आहे.

रुग्णांचा तपशील

मुंबई मनपा १२१४२, ठाणे ८२५, नवी मुंबई ७१६, कल्याण-डोंबिवली २८४, उल्हासनगर १५, भिवंडी-निजामपूर २१, मीरा-भाईंदर १९२, पालघर ४६, वसई-विरार मनपा १९४, रायगड ८१, पनवेल १३२, नाशिक मंडळ ७५७, पुणे मंडळ २४५६, कोल्हापूर मंडळ ७३, औरंगाबाद मंडळ ४९५, लातूर मंडळ ६१, अकोला मंडळ ३२१, नागपूर २१८, इतर राज्ये ३४. एसआरपीच्या बाधित जवानांत ३३ ते ४० वयाेगटातील ३३, २० ते ३० वयाेगटातील १२

बातम्या आणखी आहेत...