आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परप्रांतीय मजुरांचा गोंधळ:अनेक तास वाट पाहिल्यानंतर ट्रेन रद्द झाल्याची माहिती मिळताच मजुरांचा गोंधळ, केंद्रीय सुरक्षा दलाला पाचारन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रेनबद्दल अद्याप रेल्वे विभागाकडून अधिकृत माहिती समोर आली नाही

मजुरांच्या पलायनादरम्यान सिस्टीममधील तृटी समोर येत आहेत. गुरुवारी परत एकदा कांदिवली परिसरात घरी जाण्यासाठी मजुरांनी गर्दी केली. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी कांदिवलीमध्ये महावीर मैदानात परप्रांतीय मजुरांना बोलवण्यात आले होते. येथे त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीनंतर बसमधून त्यांना बोरीवली स्टेशनला नेण्यात येणार होते. पहिली ट्रेन बोरीवलीवरुन जौनपुरसाठी आणि दुसरी ट्रेन वसईवरुन जौनपुरसाठी निघणार होती. परंतू, यादरम्यान ट्रेन कँसल झाल्याची माहिती मजुरांमध्ये पसरली.

ट्रेनबाबत माहिती मिळताच अनेक तासांपासून वाट पाहत असलेल्या मजुरांनी गोंधळ सुरू केला. सुरुवातील पोलिसांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसल्यावर केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. ट्रेन कँसल होण्याबाबत जेव्हा सीपीआरओ वेस्टर्न रेल्वेला विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सांगितले की, कोणत्या ट्रेन कुठे आणि कधी जाणार, हे राज्य सरकारच्या हातात आहे. ही माहिती त्यांच्याकडून मिळेल. सध्या ट्रेन कँसल झाल्या का नाही, हे कळाले नाहीये.

वांद्रे स्टेशनबाहेर जमा झाली होती अशीच गर्दी

यापूर्वी मुंबईतील वांद्रे स्टेशनबाहेर मंगळवारी सकाळी श्रमिक स्पेशल ट्रेन पकडण्यासाठी पाच हजारांपेक्षा जास्त लोक एकत्र आले. जी ट्रेन निघणार होती, त्या ट्रेनसाठी फक्त एक हजार प्रवाशांचे रजिस्ट्रेनशन करण्यात आले होते. स्टेशनबाहेर वाढत्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्या लाठीचार्ज करावा लागला. 

मजुरांनी कोरोना घेऊन गावी जावू नये: उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोमवारी जनतेला अपील केली होती की, संक्रमित होऊन आपल्या गावी जाऊ नये. राज्यातील ग्रीन झोनला सुरक्षित ठेवायचे आहे. त्यांना रेड झोन बनू द्यायचे नाही. 

बातम्या आणखी आहेत...