आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात आजवर 70.35 लाख कोरोना चाचण्या, त्यात 20.34% पॉझिटिव्ह, रिकव्हरी रेट 79.3 टक्क्यांवर

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात 925 नवे बाधित, 29 मृत्यू

राज्यात आतापर्यंत ७० लाख ३५,२९६ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी २०.३४% जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी दिवसभरात १६,८३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ११ लाख ३४,५५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ७९.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, शनिवारी १४,३४८ नवे रुग्ण तर २७८ मृत्यूंची नोंद करण्यात आली. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता १४ लाख ३०,८६१ तर बळींचा आकडा ३७,७५८ वर गेला आहे. राज्यात सध्या २ लाख ५८,१०८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्युदर २.६४ टक्क्यांवर गेला आहे.

मराठवाड्यात 925 नवे बाधित, 29 मृत्यू
औरंगाबाद | मराठवाड्यात शनिवारी ९२५ नवे रुग्ण आढळले.एकूण रुग्णसंख्या १ लाख ८२,२५८ झाली. २९ रुग्णांच्या मृत्यूनंतर बळींचा एकूण आकडा ३०६६ वर गेला. नव्या रुग्णांत औरंगाबाद १८३, हिंगोली ८, लातूर १७३, परभणी १०३, जालना ६४, नांदेड १४०, बीड १४७ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १०७ रुग्णांचा समावेश आहे. ८५,८६४ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...