आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात आज रेकॉर्डब्रेक 8,139 नवीन रुग्णांची भर, 223 मृत्यू; 4,360 जणांना डिस्चार्ज, सध्या 99,202 अॅक्टीव्ह रुग्ण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुक्तांचा आकडा 1 लाख 36 हजार 985

राज्यात आज विक्रमी 8,139 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली. यासोबत राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 46 हजार 600 वर पोहचला. आज 223 मृत्युंची नोंद झाली. आज दिवसभरात 4,360 जणांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आजपर्यंत 1 लाख 36 हजार 985 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 99,202 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत 10,116 जणांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात शुक्रवारी रेकॉर्डब्रेक 8,862 नवे रुग्ण, तर 226 मृत्यूंची नोंद झाली. रुग्णांचा एकूण आकडा 2 लाख 38,461 वर गेला आहे. एकूण बळींची संख्याही 9,893 वर गेली. शुक्रवारी 5,366 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला होता. 

जालन्यात 2, नांदेडमध्ये एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

आैरंगाबाद | कोरोनामुळे शुक्रवारी जालना जिल्ह्यात दाेन, तर नांदेड येथे एक रुग्ण दगावला आहे. जालना जिल्ह्यात 56, नांदेड 34, हिंगोली 12, तर परभणी जिल्ह्यात पाच रुग्णांची भर पडली आहे.

औरंगाबाद : 277 पाॅझिटिव्ह

जिल्ह्यात शुक्रवारी नवे 277 रुग्ण, तर 3 रुग्णांच्या मृत्यूची नाेंद झाली. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 7949 वर पोहोचली आहे. एकूण बळींची संख्या 340 झाली. आजवर एकूण 4162 जण काेराेनामुक्त झाले.

0