आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाचे 5368 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 204 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 211987 झाली आहे. तर मृतांची संख्या 9 हजारांच्या पुढे गेली आहे. सरकारी आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 9026 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 1,15,262 रूग्ण बरे झाले आहेत आणि घरी परत आले आहेत. गेल्या 24 तासांत 3522 रुग्ण बरे झाले आहेत. 87681 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत 85724 लोकांना मुंबईत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या 24 तासांत 1200 नवीन प्रकरणे आढळली आहेत. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 4938 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 39 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे अॅक्टिव्ह रुग्णांची एकूण संख्या 23624 आहे.
11 कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात 11 लाख लोकांची चाचणी
महाराष्ट्रात आतापर्यंत 11,35,447 लोकांची चाचणी घेण्यात आली आहे, तर येथे एकूण लोकसंख्या 11 कोटींपेक्षा जास्त आहे. सध्या राज्यात 6,15,265 रूग्ण होम क्वारेन्टाईनमध्ये ठेवण्यात आले आहेत, तर 46,355 लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन ठेवण्यात आले आहेत.
19 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 4457 बेड तयार
डीएमईआरने वाढत्या संक्रमण लक्षात घेऊन 16 जिल्ह्यातील 19 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना रुग्ण ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना रूग्णांसाठी 4457 बेड तयार करण्यात आल्या आहेत. यात 741 आयसीयू आणि 385 व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे. तर, कोरोना रूग्णांमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेता 3 हजाराहून अधिक बेडवर ऑक्सिजनची सुविधा आहे.
कोरोनामुळे आणखी एका पोलिसांचा मृत्यू
रविवारी कोरोना संक्रमणामुळे मुंबई पोलिसांमधील आणखी एकाचा मृत्यू झाला. सहायक उपनिरीक्षक (वय 43) हे भोईवारा पोलिस ठाण्याच्या सामान्य विभागात तैनात होते. त्यांच्यावर सुमारे एक महिन्यापासून उपचार सुरू होते. संसर्गामुळे आपला जीव गमावणाऱ्या पोलिसांची संख्या 43 झाली आहे.
टाटा समूहाने 20 रुग्णवाहिका आणि 100 व्हेंटिलेटर दिले
मुंबई बीएमसी आणि टाटा ग्रुप प्लाझ्मा प्रकल्पात एकत्र काम करत आहेत. या प्रकल्पांतर्गत टाटा समूहाने बीएमसीला 10 कोटी रुपयांसोबत 100 व्हेंटिलेटरसह 20 अम्बूलन्सची मदत केली आहे. यापूर्वी टाटा समूहाच्या ताज हॉटेलने मुंबईतील वैद्यकीय कर्मचारी, रूग्णांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. यापूर्वी टाटा ट्रस्टने कोरोनाशी सामना करण्यासाठी 500 कोटींची घोषणा केली होती.
आता मुंबईत स्लिपशिवाय कोरोना टेस्ट होणार
मुंबईत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना आता कोरोना टेस्ट केली जाईल. आयसीएमआरच्या पत्रानंतर बीएमसीचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी ही माहिती दिली आहे. खासगी लॅबमध्ये डॉक्टरची स्लिप ही आवश्यक होती. या निर्णयानंतर शहरातील संशयास्पद रुग्ण लवकरात लवकर बरे करता येतील, असा विश्वास महापालिका आणि प्रशासनाचा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.