आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात शनिवारी 3427 नव्या रुग्णांची नोंद, 113 मृत्यू; मृतांच्या बाबतीत महाराष्ट्र 16 देशांपेक्षा पुढे

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 6 लाखांवर टेस्ट 16.18% नमुने पॉझिटिव्ह

राज्यात शनिवारी दिवसभरात 3 हजार 427 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या  1 लाख 4 हजार 568 झाली आहे. गेल्या 24 तासांत 113 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 3830 झाली आहे. 

राज्यात कोरोना टेस्टची फी केली कमी, आता 2200 रुपयांत होणार चाचणी 

राज्य सरकारने खासगी प्रयोगशाळेत घेण्यात येणारे कोरोना चाचणी शुल्क कमी केले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी सांगितले की, कोरोना चाचणीची फी 4500 रुपयांवरून 2200 रुपये करण्यात आली आहे. घरातून नमुने घेण्यासाठी आपल्याला 2800 रुपये द्यावे लागतील. यामुळे लोकांना दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले.

मागील 3 दिवसांत 10 हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

महाराष्ट्रात 3 दिवसांत 10,354 नवे पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. महाराष्ट्रात संपूर्ण जगातील 198 देशांपेक्षा जास्त संक्रमित रुग्ण आहेत. मुंबईत मागील 24 तासांत 1,366 नवीन रुग्ण आढळले, तर 90 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आता एकूण रुग्णसंख्या 55,451 आणि मृत्यू 2,044 झाले आहेत. यामध्ये 28,248 अॅक्टीव्ह रुग्ण असून 25,152 रुग्ण बरे झाले आहेत. 

कॅनडा, चीन सारखे देश महाराष्ट्राच्या मागे

ज्या चीनमधून कोरोना व्हायरसची सुरुवात झाली, त्याला महाराष्ट्राने चार दिवसांपूर्वीच मागे टाकले. चीनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 83 हजारच्या जवळपास आहे. यातील फक्त काही 100 च अॅक्टीव्ह केस आहेत. महाराष्ट्राने कॅनडाला देखील मागे टाकत जगात 17 व्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले आहे. worldometers नुसार, कॅनडात शुक्रवारी सकाळी 97 हजार पॉझिटिव्ह रुग्ण होते. आता दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, थायलंड, फिलीपाइन्स, बांगलादेश, मलेशिया आणि जपान यांसारख्या देशात महाराष्ट्रापे7ा कमी रुग्ण आहेत. 

मध्य आशियाच्या तबलिगी जमातच्या नऊ सदस्यांना मिळाला जामीन

मुंबई उच्च न्यायालयच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी तबलिगी जमातच्या त्या 9 सदस्यांना जामीन दिला आहे जे मध्य आशियाई देश कझाकिस्तान आणि किर्गिस्तानचे नागरिक आहेत. हे सर्व गडचिरोली जिल्ह्यात राहत होते. या सर्व सदस्यांना 2 एप्रिल रोजी व्हिसा शर्तींचे उल्लंघन आणि लॉकडाउन बंदीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. कोर्टाने सदस्यांना 20 हजार रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर करत चंद्रपूरमध्ये राहून संबंधित पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश दिले.

मृतांच्या बाबतीत महाराष्ट्र 16 देशांपेक्षा पुढे

मृतांच्या बाबतीतही महाराष्ट्र जगातील 196 देशांपेक्षा पुढे आहे. यात पाकिस्तान देखील महाराष्ट्रापेक्षा मागे आहे. पाकिस्तानात शुक्रवारपर्यंत 2463 मृत्यू झाले तर महाराष्ट्रात हा आकडा 3.590 होता. जगातील 73 देशांमध्ये मृतांचा आकडा 10 पेक्षा कमी आहे. तर 69 देशांत हा आकडा 10 ते 99 दरम्यान आहे. मृतांमध्ये सर्वाधिक 116,035 संक्रमित अमेरिकात आहेत. तर 30 देश असे आहेत जेथे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 

जगात 5.68% आणि महाराष्ट्रात 3.68% मृत्यूदर

12 जून सकाळपर्यंत भारतासह संपूर्ण जगात 72,73,958 संक्रमित रुग्ण होते आणि 4,13,372 जणांचा मृत्यू झाला होता. तर भारतात ही संख्या 2,97,353 आणि मृतांची संख्या 8,498 होती. यातील 3,590 मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले. मृत्यूदराच्या बाबतीत संपूर्ण जगातील कोरोनारुग्णांचा मृत्यूदर 5.68% आहे. तर महाराष्ट्रात हा दर 3.68% आहे. 

मृतांपैकी ७०% रुग्णांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग :

शुक्रवारी नोंद झालेल्या १२७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६७ रुग्ण होते, तर ५२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील होते. ८ जण ४० वर्षांखालील होते. या १२७ रुग्णांपैकी ८९ जणांमध्ये (७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे अति जोखमीचे आजार आढळले आहेत.

आतापर्यंत 6 लाखांवर टेस्ट 16.18% नमुने पॉझिटिव्ह

राज्यात सध्या ५३ शासकीय आणि ४२ खासगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोविड-१९ च्या निदानासाठी कार्यरत आहेत. १२ जूनपर्यंत आलेल्या ६,२४,९७७ नमुन्यांपैकी १.०१,१४१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १६.१८% आहे.

राज्याचा रिकव्हरी दर ४७.३ %

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ४७.३% आहे. राज्यात १२ जूनपर्यंत एकूण ४७,७९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ४९,६१६ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ३७१७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्युदर ३.७ टक्के आहे.

बातम्या आणखी आहेत...