आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासी मजुर:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे केंद्र सरकारला पत्र, परराज्यात अडकलेल्या प्रवासी मजुरांकडून तिकीट भाडे न घेण्याची विनंती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऊर्जा मंत्री नितिन राउत यांनी यापूर्वीच रेल्वे मंत्रालयाला प्रवासी मजुरांकडून पैसे न घेण्याची विनंती केली आहे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनदरम्यान ट्रेनने प्रवास करुन आपल्या घरी जाणाऱ्या मजुरांकडून तिकीट भाडे न घेण्याची केंद्र सरकारला विनंती केली आहे. उद्धव ठाकरेंनी केंद्राला यासंबंधी एक पत्रदेखील पाठवले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केंद्राला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील विविध केंद्रात 40 दिवस अंदाजे पाच लाख प्रवासी कामगारांच्या खाण्याची आणि राहण्याची सोय करण्यात आली. आता त्यांना आपाल्या घरी जाण्याची इच्छा झाली आहे. या मजुरांकडे कमाईचे कोणतेच साधन नाही. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्याकडून कोणतेच भाडे घेऊ नये.''

अनेक खासगी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते तिकीटाचा खर्च उचलण्यास तयार

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, अनेक खासगी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते या प्रवासी मजुरांच्या तिकीटाचे खर्च उचलण्यास तयार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना यासंबंधी सूचना दिल्या आहेत. तसेच, त्यांनी म्हटले की, जर केंद्राने मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या शहरातून प्रवासी मजुरांना काढण्यासाठी ट्रेन सुरू केल्या, तर मोठा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळेच, अशा वेळी या कामगारांच्या समुहांना सांभाळण्यासाठी तयार राहावे लागेल. यापूर्वीच महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितिन राउत यांनी रेल्वे मंत्रालयाला या प्रवासी मजुरांकडून भाडे न घेण्याची विनंती केली होती.

बातम्या आणखी आहेत...