आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राच्या आरोपांवर आरोग्यमंत्री:'कामगिरी चांगली नाही म्हणून कोरोना वाढतोय असे म्हणणे चुकीचे, महाराष्ट्र फायनेंशियल हब असल्याने इतर राज्यांशी तुलना होऊ शकत नाही'

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आठवड्याला 40 लाख लसींची आवश्यकता

राज्यात कोरोना लसींचा तुटवडा असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली होती. यानंतर केंद्राने राज्य सरकारवर निशाणा साधत आपले अपयश झाकण्यासाठी सरकार आरोप करत असल्याचे म्हटले होते. आता यावर राजेश टोपे यांनी उत्तर देत 'मला कुणाशी वाद घालायचा नाही, मुख्यमंत्र्यांपासून सर्वजण आहोरात्र काम करत आहोत, केंद्राने सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्या जात आहेत' असे म्हटले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने हातात हात घालून या महामारीचा सामना करावा

दरम्यान देशभरात महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आढळत आहेत. यावरुन केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकार चुका करत असल्याने येथे रुग्ण संख्या वाढत असल्याचे म्हटले होते. यावरुन बोलताना राजेश टोपे म्हणाले की, 'मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना इतर राज्यांशी होऊ शकत नाही. महाराष्ट्र फायनेंशियल हब आहे. यामुळे बाहेरचे लोक येथे मोठ्या प्रमाणात येत असतात. एकच सांगू शकतो की, केंद्राने सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्ही करत आहोत. आम्हाला कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाही. केंद्र आणि राज्य सरकारने हातात हात घालून या महामारीचा सामना करायला पाहिजे.'

आम्ही पारदर्शक पध्दतीने काम करत आहोत
महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. त्यामुळे दहा लाख हा मानांक आहे. आम्ही पारदर्शक पध्दतीने काम करत आहोत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसारच सर्वच कामे सुरू आहेत. महाराष्ट्र 70 टक्के आरटीपीसीआर आणि 30 टक्के अँटिजेन टेस्ट करतो. उत्तर प्रदेशात 90 टक्के अँटिजेन टेस्ट होतात. अँटिजने टेस्ट करायलाच नको. मुंबई आणि पुण्यामध्ये टेस्टिंग वाढवण्यात आले आहे. दहा लाखांमागे तीन ते चार लाख लोकांचे टेस्टिंग केले जातेय.

दीड दिवसाचा लसीचा साठा
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रातील कामगिरी चांगली नसल्याने येथे कोरोना रुग्ण वाढत असल्याचे म्हटले होते, यावर राजेश टोपे म्हणाले की,महाराष्ट्राची कामगिरी चांगली नाही म्हणून कोरोना वाढतोय हे सांगितले जातेय हे चुकीचे आहे. महाराष्ट्राकडे दीड दिवसाचा लसीचा साठा आहे. अनेक जिल्ह्यात लसीकरण ठप्प होते हे चुकीचे आहे. आमची मागणी 40 लाख लसी इतकीच आहे.'

आठवड्याला 40 लाख लसींची आवश्यकता
पुठे बोलताना टोपे म्हणाले की, 'डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली, पवार साहेब केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोललो. आठवड्याला 40 लाख लसींची आवश्यकता आहे. त्यामुळे या लसी दिल्या जाव्यात. सातारा, सांगली, पनवेलला लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद पडले आहे. लसीकरणाची केंद्र वाढवल्या असल्याचेही हर्षवर्धन यांना कळवले. तसेच महाराष्ट्राला साडे सात लाख आणि इतर राज्यांना जास्त लसी का? मला कुणाशी वाद घालायचा नाही. मला कोणाला दोष द्यायचा नाही.'

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कमी लसी का?
राजेश टोपेंनी केंद्र सरकारला थेट सवाल केला आहे. गुजरातमध्ये 6 कोटी लोकसंख्या आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. त्यांच्याकडे आत्तापर्यंत 1 कोटी डोस देण्यात आले, आपल्याला 1 कोटी 4 लाख डोस दिले. गुजरातमध्ये 17 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आपल्याकडे 4.5 लाख आहेत. मृतांचा आकडा देखील आपल्याकडे खूप जास्त आहे. जिथे जास्त गरज आहे, तिथे अधिक लक्ष देण्यात यावे ही मागणी असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...