आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचा निर्णय:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाचा निर्णय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान राज्य सरकारकडून विविध निर्बंध लादले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने या महिन्यात पक्षाचे होणारे नियोजित शिबीर व इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी याविषयी माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाच्या मंत्र्यांची व नेत्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नवाब मलिकांनी याविषयी माहिती दिली. गर्दी होणार नाही असे कुठलेही कार्यक्रम मंत्री किंवा नेत्यांनी घेऊ नये असा निर्णय बैठकीमध्ये झाला असल्याचे मलिक म्हणाले.

या बैठकीमध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे असे देखील मलिक म्हणाले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूका नकोत ही पक्षाची सुरुवातीपासून भूमिका आहे आणि तीच कायम राहणार असल्याचे मलिक म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...