आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेश टोपेंचे आवाहन:रुग्ण संख्या वाढत असली तरी घाबरु नका! 86 टक्के रुग्णांना सौम्य लक्षणं, आरोग्यमंत्र्यांची माहिती; तर सेल्फ किटद्वारे टेस्ट करणाऱ्यांना महत्त्वाचे आवाहन

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना घाबरुन न जाण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील रुग्ण संख्येतील 86 टक्के रूग्णांना सौम्य लक्षणे आहेत आणि हे सर्व रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. तर उर्वरीत 14 टक्क्यांमध्येही केवळ 2.8 टक्के रूग्ण गंभीर वर्गवारीत आहे अशी माहिती देखील राजेश टोपेंनी दिली आहे. यासोबतच आज राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, 'आज महाराष्ट्रात अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या 2 लाख 45 हजार झाली आहे. मात्र असे असले तरी दिलासा आहे. कारण 86 टक्के लोक होम क्वारंटाइन आहेत. त्यांना सर्दी-खोकला एवढीच लक्षणे दिसत आहेत. उर्वरित 14 टक्के जे रूग्णालयात आहेत यामधील केवळ 0.9 टक्के रूग्ण आयसीयूत आहेत. व्हेंटिलेटरवर 0.32 टक्के, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर 0.59 टक्के रुग्ण आहेत. तर केवळ ऑक्सिजन बेड असलेल्या ठिकाणी 1.89 टक्के रूग्ण आहेत.' यामुळे धोका कमी आहे.

सेल्फ किटद्वारे चाचणी करणाऱ्या नागरिकांना राजेश टोपेंचे महत्त्वाचे आवाहन
आता सेल्फ किटद्वारे देखील कोरोना चाचणी करणे शक्य झाले आहे. यामुळे अनेक लोक सेल्फ किटद्वारे कोरोना टेस्ट करत आहेत. अशा वेळी त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असला तरी यांची माहिती ते संबंधित विभागाला कळवत नाहीत. अशा लोकांना राजेश टोपेंनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्या लोकांनी जवळच्या आरोग्य केंद्रावर माहिती द्यायला हवी. आम्ही प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की, सेल्फ टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला जास्ती त्रास नसेल तर त्यांनी होम क्वारंटाईन राहू द्यावे. केवळ तुम्हाला दिवसातून फक्त दोन कॉल करण्यात येतील आणि तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाईल. असे देखील टोपे म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...