आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोनाबाधितांची संध्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. यामुळे मुंबई महापालिकेच्या हद्दीत 10 वी व 12 वीचे वर्ग वगळता इतर सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
कोरोनाची लाट ओसरली असल्यामुळे शाळांच्या घंटा पुन्हा वाजल्या होत्या. मात्र, मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे मुंबईमधील सर्व शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही घोषणा केली.
राज्यासह देशभरातील कोरोना संक्रमितांमध्ये वाढ होत आहे. राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत कोरोना रुग्ण सर्वात जास्त आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. देशभरात कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 123 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही वाढून 1,45,582 एवढी झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.