आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात बुधवारी सापडले 5,537 नवे रुग्ण, 198 मृत्यू; एकूण रुग्ण 1 लाख 80,298

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६७ टक्के तर मृत्युदर ४.४७ टक्के

राज्यात बुधवारी ५,५३७ नवे रुग्ण तर १९८ मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील रुग्णांचा एकूण आकडा १ लाख ८०,२९८ तर बळींची संख्या ८,०५३ वर गेली आहे. नव्या मृत्यूंपैकी ६९ मृत्यू हे गेल्या ४८ तासांतील, तर उर्वरित १२९ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. शनिवारी २,२४३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांचा एकूण आकडा ९३,१५४ वर गेला. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६७ टक्क्यांवर पोहोचले आहे. आता राज्यात ७९,०७५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्युदर ४.४७ टक्के झाला आहे.

0