आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यातील रुग्णसंख्या 2 लाख 6 हजार 619 वर, रविवारी 6,555 नवीन रुग्णांची नोंद

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालाडच्या एव्हर्सिन नगरमध्ये मोठ्या संख्येने तपासणीसाठी दाखल झालेले बीएमएस आरोग्य कर्मचारी - Divya Marathi
मालाडच्या एव्हर्सिन नगरमध्ये मोठ्या संख्येने तपासणीसाठी दाखल झालेले बीएमएस आरोग्य कर्मचारी

राज्यात रविवारी(दि.5) 6,555 नवीन रुग्णांची नोंद, तर 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 6 हजार  619 झाली असून, आतापर्यंत राज्यात 8,822 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. चांगली बाब म्हणजे, आज 3,658 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत  1 लाख 11 हजार 747 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात  86,040 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापूर्वी शनिवारी दिवसभरात विक्रमी ७,०७४ नवे रुग्ण, तर २९५ मृत्यूंची नोंद झाली. 

> 09 मार्चला राज्यात पहिला रुग्ण सापडला

> 50 दिवसांत 10,500 वर रुग्ण झाले

> 93 दिवसांत 12 जूनला 1 लाख रुग्ण

> 23 दिवसांत 4 जुलैला 2 लाख रुग्ण

बातम्या आणखी आहेत...