आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:सोमवारी 2 हजार 33 नवीन रुग्णांची नोंद, राज्यातील एकूण रुग्णसंख्या 35 हजार 86 वर

मुंबई, पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत रुग्ण दुपटीचाअवधी 14.5 दिवसांवर, पुण्यात कोरोना बाधितांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी दोनशेपार

राज्यातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून आज राज्यात तब्बल २०३३ नवीन रुग्ण सापडले आहेत. यासोबतच राज्यातील एकूण आखडा ३५०८६ झाला आहे.  तसेच, आज ५१ रुग्णांचा मृत्यू झाला असू, एकूण मृतांचा आकडा १२४९ झाला आहे.

रविवारी राज्यात काेराेनाचे २,३४७ नवे रुग्ण सापडले. एकाच दिवसात दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळल्याची ही पहिलीच वेळ आहे. तर रविवारी ६३ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

मुंबईत रुग्ण दुपटीचाअवधी १४.५ दिवसांवर

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला असून तो आता १४.५ दिवसांवर गेला आहे. केंद्र सरकारची डिस्चार्ज पॉलिसी काटेकोरपणे पाळली जात आहे. हे पाहता परिस्थितीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवू शकतो, असे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी म्हटले आहे.

एका पेशंटसाठी संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन केल्याने यंत्रणेवरचा ताण वाढत होता. त्याऐवजी आता काही इमारती सील केल्या जातील. यात लोकसहभागातून सुविधा पुरवल्या जातील. केवळ वैद्यकीय सुविधा महापालिका देईल. अॅम्ब्युलन्स ८० होत्या, त्यांची संख्या ३५० झाली. सोमवारपासून या अॅम्ब्युलन्स रस्त्यावर सेवेत दिसतील, यात बेस्टच्या कन्व्हर्टेड अॅम्ब्युलन्सही असतील. गेल्या आठवड्यात ५० डॉक्टर वर्ध्यातून आले. १०० डॉक्टर अंबाजोगाई, लातुरातून येत आहेत. आया, वॉर्डबॉय यांची कमतरता आहे. हे खूप लांबून प्रवास करून मुंबईत येत आहेत. त्यांना ८ तास काम करून ६ तासांचा प्रवास करावा लागतोय. त्यांच्यासाठी कामाच्या वेळांमध्ये बदल वा जवळ राहण्याच्या व्यवस्थेचे प्रयत्न सुरू आहेत, असेही चहल यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...