आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:आज नवीन 2250 रुग्णांची नोंद, तर 65 रुग्णांचा मृत्यू; मुंबईतील 100 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
लॉकडाउनदरम्यान श्रमिक स्पेशल ट्रेन पकडण्यासाठी सीएसटी स्टेशनकडे निघालेल्या दोन दिव्यांग प्रवासी. - Divya Marathi
लॉकडाउनदरम्यान श्रमिक स्पेशल ट्रेन पकडण्यासाठी सीएसटी स्टेशनकडे निघालेल्या दोन दिव्यांग प्रवासी.
  • राज्यात दिवसभरात 1202 रुग्ण झाले कोरोनामुक्त

महाराष्ट्रात बुधवारी 2250 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. राज्यात आता एकूण संक्रमितांची संख्या 39 हजार 297 झाली आहे. तर, 24 तासात 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 41 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत.  

मंगळवारी राज्यात 2127 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. तर 76 रुग्णांचा काल मृत्यू झाला. यात मुंबईतील 43 रुग्ण होते. राज्यात आतापर्यंत 1325 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत 800 रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात मंगळवारी एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल 1202 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 25% तर मृत्यूदर 3.2% आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 14 दिवसांवर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.

मुंबई: 100 पेक्षा जास्त संक्रित बेपत्ता

मुंबईतील 100 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण बेपत्ता झाले आहेत. बीएमसी प्रशासन आणि पोलिस विभाग या रुग्णांना शोधत आहे. दरम्या, या सर्व रुग्णांनी दिलेला घरचा पत्ता खोटा असल्याचेही समोर आले आहे. त्यांच्या ओळखपत्रावरुन त्यांचा शोध सुरू आहे. बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी रुग्ण बेपत्ता झाल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, चुकीचा मोबाईल नंबर दिल्यामुळे बेपत्ता झालेल्या रुग्णांना संपर्क करता येत नाहीये. या रुग्णांची कोरोना चाचणी वांद्रेतील एका कंपनीने केली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी खासगी लॅबच्या सीसीटीव्ही फुटेज तपासल्या जात आहेत. 

फेज-4 साठी राज्याने मंगळवारी नवीन गाइडलाइन जारी केली आहे. राज्याला आता तीन झोनमध्ये विभागण्यात आले आहे. पहिला रेड झोन, दुसरा नॉन रेड झोन आणि तिसरा कंटेनमेंट झोन. नॉन रेड झोनलाच ग्रीन किंवा ऑरेंज झोन समजले जात आहे. याशिवाय कंटेनमेंट एरियात अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...