आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यातील संक्रमितांचा आकडा 41हजार 642 वर; आज 2345 नवीन रुग्णांची नोंद, तर 64 मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील बीकेसीमध्ये देशातील पहिले ओपन हॉस्पिटल तयार करण्यात आले. - Divya Marathi
मुंबईतील बीकेसीमध्ये देशातील पहिले ओपन हॉस्पिटल तयार करण्यात आले.

महाराष्ट्रातील संक्रमितांचा आकडा 40 हजारांच्या पुढे गेला आहे. गुरुवारी(दि.21) 2345 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 41,642 झाली आहे. तसेच, गुरुवारी 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1454 जणांचा कोरोनामुळे बळी झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 10 हजार 318 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यातील 6 हजार 460 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. राज्यात बुधवारपासून गुरुवार सकाळपर्यंत कोरोनाच्या 2 हजार 250 नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील 1 हजार 372 मुंबईतील आहेत. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 39 हजार 297 वर पोहचली आहे. बुधवारी कोरोनामुळे 65 लोकांचा मृत्यू झाला. यातील 41 मुंबईत आहेत. यासोबत मुंबईतील मृतांची संख्या 841 झाली आहे. तर राज्यात आतापर्यंत 1 हजार 390 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील सुमारे 4 लाख लोक क्वारंटाइन

राज्य सरकार आता संसर्ग रोखण्यासाठी क्वारंटाइनवर भर देत आहे. मागील 9 दिवसांत राज्यात होम क्वारंटाइनच्या प्रकरणांत 58% तर संस्थात्मक क्वारंटाइनच्या प्रकरणांत 46 टक्के वाढ झाली. 10 मे रोजी राज्यभरात होम क्वारंटाइनमध्ये 2 लाख 44 हजार 327 आणि संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये 14 हजार 465 लोक होते. 19 मे रोजी होम क्वारंटाइनमध्ये राहणाऱ्यांची संख्या 58 टक्क्यांनी वाढून 3 लाख 86 हजार 192 आणि संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये राहणाऱ्यांची संख्या 46% वाढून 21 हजार 150 झाली आहे. यानुसार एकूण क्वारंटाइनमध्ये असणाऱ्यांची संख्या 4 लाखांपर्यत पोहचली आहे.

कोरोनामुळे दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू 

मुंबईत कोरोनामुळे दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा बुधवारी मृत्यू झाला. त्यातील एक हवालदार विक्रोळी पार्कीसाइट पोलिस ठाण्यात तर दुसरा सहार येथील वाहतूक पोलिसात तैनात होता. सुमारे आठवडाभरापूर्वी हवालदारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर ट्रॅफिक पोलिसाची प्रकृती खालावली होती. कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना 65 लाखांचे आर्थिक अनुदान आणि सोबत कुटुंबातील एका सदस्याला सरकारनी नोकरी देण्याचे सरकारने जाहीर केले आहे.    

बातम्या आणखी आहेत...