आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:आज नवीन 2,608 रुग्णांची नोंद, तर 60 रुग्णांचा मृत्यू, एकूण संख्या 47,190 वर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या सांताक्रूझच्या कलिना भागात राहणारे ईशान्येकडील शेकडो लोक त्यांच्या राज्यात जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षा करताना - Divya Marathi
मुंबईच्या सांताक्रूझच्या कलिना भागात राहणारे ईशान्येकडील शेकडो लोक त्यांच्या राज्यात जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षा करताना
  • सलग सातव्या दिवशी राज्यात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजारांपेक्षा अधिकने वाढली

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या रोज वाढत आहे. मागील सात दिवसांपासून दररोज 2 हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. आज(दि.23) राज्यात 2,608 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यासोबतच राज्यातील संक्रमितांचा एकूण आकडा 47 हजार 190 झाला आहे. तर, 32209 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच, आज राज्यात 60 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या 1,577 झाली आहे. यात चांगली बाब म्हणजे, आज 821 रुग्ण ठाक झाले आहेत, राज्यात आता 32,404 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

परीक्षा न घेण्यावर राज्यपाल नाराज

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्यासाठी यूसीजीला पत्र लिहिल्यामुळे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. अयोग्य हस्तक्षेप टाळण्यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या मंत्र्यांना योग्य त्या सूचना देण्यास सांगितले. हे यूजीसी मार्गदर्शक तत्त्वांचे तसेच महाराष्ट्र राज्य विद्यापीठ अधिनियम -2016 च्या तरतुदींचे उल्लंघन असल्याचे कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले. युजीसीला अंतिम वर्षाची वार्षिक परीक्षा रद्द करण्याची शिफारस करण्यापूर्वी मंत्र्यांनी त्यांना माहिती दिली नसल्याचेही राज्यपाल म्हणाले. 

मुंबईत दारूची ऑनलाइन डिलिव्हरी सुरू 

बीएमसीने मुंबईत अटी आणि शर्तींसह दारुची होम डिलिव्हरी करण्यात परवानगी दिली आहे. होण डिलिव्हरी फक्त सीलबंद बाटल्यांतून करण्यात येईल. कंटेनमेंट झोनच्या बाहेर ज्यांची घरे आहेत ते लोक आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करुन दारूच्या दुकानातून बाटल्यांची होम डिलीव्हरी घेऊ शकतात.  मुंबईत सध्या दुकानांतून दारू विक्रीस परवानगी नाही.

बातम्या आणखी आहेत...