आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:आज नवीन 2436 रुग्णांची नोंद, तर 60 रुग्णांचा मृत्यू; एकूण रुग्ण 52,667

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 31 हजार 972 वर

राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. सोमवारी(दि.25) 2,436 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 52,667 वर गेला आहे. यात एकट्या मुंबईत 31,972 रुग्ण झाले आहेत. तसेच, आज 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासोबतच एकूण बळींची संख्या 1,695 झाली आहे. काल एकाच दिवसातील आजवरचे सर्वाेच्च 3,041 नवीन रुग्ण आढळले होते. तर, 58 रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोना संक्रमितांमधील लक्षणे जाणून घेण्यासाठी बीएमसी मोठ्या प्रमाणात लोकांचा एक्स-रे करणार आहे. यासाठी प्रशासनाने 10 डिजिटल एक्स-रे मशीन तयार केल्या आहेत. यांना कुठेही घेऊन जाता येईल. सुरुवातील रोज 500 एक्सर-रे करण्याचे लक्ष आहे. चीनमध्येही याच तंत्रज्ञांनाचा वापर केला होता. लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या लंग्सच्या एक्स-रेच्या आधारावर रुग्ण किती गंभीर आहे, हे कळू शकेल. अशा केसमध्ये त्यांना सुरुवातीलाच हॉस्पीटलमध्ये पाठवले जाईल. 
  
14 हजार लोक कोरोना मुक्त, 5 लाखांपेक्षा जास्त क्वारेंटाइन

राज्यात आतापर्यंत 14,600 रुग्णांनी कोरोनाला मात दिली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी 4 लाख 99 हजार 387 लोकांना घरात आणि 35,107 लोकांना इतर ठिकाणी क्वारेंटाइन करण्यात आले आहे. आतापर्यंत 3 लाख 62 हजार 862 लोकांची चाचणी घेण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...