आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:आतापर्यंत 35,058 कोरोना रुग्ण : राज्यात आजपासून सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या 5 कंपन्या तैनात करणार; भाजपचे 'महाराष्ट्र बचाओ' आंदोलन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
बस पकडण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या प्रवासी मजुरांना सोशल डिस्टन्स ठेवण्यास समजुन सांगताना पोलिस कर्मचारी - Divya Marathi
बस पकडण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या प्रवासी मजुरांना सोशल डिस्टन्स ठेवण्यास समजुन सांगताना पोलिस कर्मचारी
  • 20 लाख मजुरांनी घरी परतण्यासाठी केले अर्ज

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी 2 हजारावर रुग्णांची नोंद झाली. 2033 नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण रुग्णसंख्या 35 हजार 58 वर पोहोचली. सोमवारी 51 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. एकूण बळींचा आकडा 1,249 वर गेला आहे. सोमवारी 749 रुग्ण बरे हाेऊन घरी गेले. आजवर एकूण 8,437 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

राज्यात आजपासून सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या 5 कंपन्या तैनात करणार

राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आजपासून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) च्या पाच कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. मुंबईतील 1, 3, 5, 6 आणि 9 झोनमध्ये या कंपन्या तैनात केल्या जातील. मुंबई पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली. याआधी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) कंपन्यांची पहिली तुकडी सोमवारी मुंबई दाखल झाली. पोलिसांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला सीएपीएफ पाठवण्याची विनंती केली होती.

आजपासून ठाकरे सरकारविरोधात 'महाराष्ट्र बचाओ' आंदोलन

कोरोना संक्रमण दरम्यान भारतीय जनता पार्टी आज (मंगळवार) पासून राज्यात 'महाराष्ट्र बचाओ' आंदोलन सुरू करणार आहे. त्याअंतर्गत महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाच्या विरोधात भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देतील. शुक्रवारी पक्षाचे सर्व कार्यकर्ते, अधिकारी, लोकप्रतिनिधी हातात फलक घेऊन उभे राहतील. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की उद्धव सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरले आहे.

20 लाख मजुरांनी घरी परतण्यासाठी केले अर्ज

मुंबईसह राज्यभरातील 20 लाख मजूर आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यात मुख्यतः उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील मजूर आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत 3 लाख मजुरांनी त्यांच्या राज्यात पाठवले आहे. याशिवाय खासगी वाहनांवरून किंवा पायी जाणाऱ्या कामगारांची शासनाकडे कोणतीही नोंद नाही. याची पुष्टी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...