आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:संक्रमितांचा आकडा 2.23 लाखांच्या पुढे; राज्यात बुधवारी 6 हजार 603 रुग्णांची नोंद, तर 198 जणांचा मृत्यू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात राज्यात 6 हजार 603 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, 198 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 23 हजार 724 वर पोहचली आहे. दरम्यान, आज राज्यात 4,634 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यातील एकूण करोनाबाधितांमध्ये, आतापर्यंत करोनावर 1 लाख 23 हजार 192 रुग्णांवर मात केली असून, 9 हजार 448 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 91 हजार 065 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. ही आकडेवारी https://www.covid19india.org/ वेबसाइटनुसार आहे. यापूर्वी मंगळवारी राज्यात 5,134 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 224 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

0