आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:कोरोनाग्रस्तांची संख्या 2.30 लाखांवर; गुरुवारी राज्यात 6,875 रुग्णांनी नोंद तर 219 रुग्णांचा मृत्यू

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील अंबुजवाडी परिसरात घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करणारे बीएमसीचे आरोग्य कर्मचारी. - Divya Marathi
मुंबईतील अंबुजवाडी परिसरात घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करणारे बीएमसीचे आरोग्य कर्मचारी.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी(दि.9) राज्यात 6,875 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील संक्रमितांचा एकूण आकडा 2 लाख 30 हजार 599 झाला आहे. आज राज्यात 219 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण बळींची संख्या 9,667 झाली आहे. चांगली बाब म्हणजे, आज राज्यात 4,067 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या राज्यात 93,654 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत, तर 1,27,259 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यापूर्वी  बुधवारी 6,603 नवे रुग्ण, तर 198 मृत्यूंची नोंद झाली.

राज्यात 5713 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण 

राज्यात 278 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची पुष्टी झाल्यानंतर पोलिस दलातील संक्रमितांची संख्या 5,713 झाली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, कोरोनामुळे आतापर्यंत 71 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, मुंबईत सर्वाधिक 43 पोलिसांनी आपला जीव गमावला. मृतांमध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान आतापर्यंत 4531 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. 

धारावीत आता 329 अॅक्टीव्ह रुग्ण

मुंबईतील कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत बुधवारी कोरोनाचे तीन रुग्ण आढळले. यासोबत येथील रुग्णसंख्या 2,338 झाली आहे. मंगळवारी येथे केवळ एक रुग्ण आढळला होता. एकेवेळी धारावी हॉटस्पॉट बनला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, धारावीत सध्या 329 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत तर 1,768 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

आर्थर रोड जेलमधील 181 पैकी 177 कैदी कोरोनामुक्त 

मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात कोरोनाने संक्रमित झालेल्या 181 पैकी 177 कैदी बरे झाले आहेत. आर्थर रोड जेल ही महाराष्ट्रातील असे पहिले कारागृह होते जिथे कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत होते, परंतु कोविड प्रोटोकॉलचे कडक पालन केल्याने स्थिती बदलली. दरम्यान एका आठवड्यात इतर चौघांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येईल अशी तुरुंग अधिकाऱ्यांना आशा आहे.

पुढील 3 महिन्यांसाठी 5 रुपयांना मिळेल शिवभोजन थाळी 

महाराष्ट्र सरकारने बुधवारी निर्णय घेतला की शिवभोजन थाळी पुढील तीन महिन्यांसाठी पाच रुपयांना देण्यात येईल. शिवसेनेचे नेतृत्व असलेल्या सरकारने गरीबांसाठी दहा रुपये दराने जेवण मिळावे यासाठी शिवभोजन योजना सुरू केली. कोरोना संकटामुळे होणार्‍या अडचणी लक्षात घेता एप्रिलमध्ये सरकारने पाच रुपयांमध्ये थाळी देण्याचे ठरविले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser