आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्याचा कोरोनामुक्तीचा दर 90 टक्क्यांवर, आतापर्यंत 15.24 लाखांवर रुग्णांची कोरोनावर मात

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील मृत्यूदर 2.61 टक्के, आतापर्यंत 44 हजार 125 रुग्णांचा मृत्यू

राज्यात सोमवारी 4009 नवीन रुग्ण आढळले तर 104 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने राज्याचा कोरोनामुक्तीचा दर वाढला आहे. हा दर 90 टक्क्यांवर गेला आहे. सोमवारी 10 हजार 225 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 15 लाख 24 हजारांवर गेली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 16 लाख 87 हजार 784 झाली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 44 हजार 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.61 टक्के एवढे आहे.

दिवाळीनंतर कोरोनाची महाराष्ट्रात दुसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावर सोमवारी आपली भूमिका स्पष्ट केली. काही तज्ज्ञ अशा प्रकारची शक्यता व्यक्त करत आहे. अशा कुठल्याही लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. सरकारने तयार केलेला टास्क फोर्स याबाबात अभ्यास करत असल्याचे टोपे त्यांनी सांगितले. दिवाळीमुळे होणारी गर्दी आणि आलेला हिवाळा यामुळे दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत असून आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचेही ते म्हणाले.