आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 13,348 रुग्ण बरे, मात्र दिवसभरात 12,248 नव्या रुग्ण आणि 390 बाधितांच्या मृत्यूची नोंद

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीड जिल्ह्यातील 6 शहरांत बुधवारपासून लॉकडाऊन

राज्यात रविवारी १३,३४८ कोरोना रुग्ण बरे झाले. मात्र दिवसभरात १२,२४८ नव्या रुग्ण आणि ३९० बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ५ लाख १५ हजार ३३२ झाली असून त्यापैकी ३,५१,७१० रुग्ण बरे झाले अाहेत. १ लाख ४५,५५८ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

मराठवाड्यात १२०५ नवे रुग्ण, २१ मृत्यू

मराठवाड्यात कोरोनाने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले असून रविवारी तब्बल १२०५ नवे रुग्ण आणि ३७ बळींची नोंद झाली. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात १६ मृत्यूंची नोंद झाली असून जालना ७, लातूर ६, परभणी-उस्मानाबाद प्रत्येकी २, तर नांदेड जिल्ह्यात ४ रुग्ण दगावले आहेत. तसेच औरंगाबादेत २६३ रुग्ण आढळले असून मराठवाड्यातील इतर शहरांतही कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बीड जिल्ह्यात २०३, नांदेड १४१, हिंगोली २५, जालना ६०, लातूर २५४, उस्मानाबाद २०६ आणि परभणी जिल्ह्यात ५३ रुग्ण आढळले आहेत.

बीड जिल्ह्यातील ६ शहरांत बुधवारपासून लॉकडाऊन

बीड जिल्ह्यातील बीड, परळी, अंबाजाेगाई, माजलगाव, अाष्टी अाणि केज या सहा शहरांत १२ ऑगस्टच्या रात्री १२ पासून पुढील दहा दिवस जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लॉकडाऊन घोषित केले आहे. यामध्ये केवळ जीवनावश्यक वस्तू, मेडिकल स्टोअर्स आदींना वगळण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...