आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात रुग्णांच्या मृत्यूसंख्येने ओलांडला 40 हजारांचा आकडा, कोरोनामुक्तांच्या संख्येतही दिलासादायक वाढ; एकूण रुग्णसंख्या 15.17 लाख

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचा कोरोनामुक्तीचा दर 82.76 टक्के तर मृत्युदर 2.64 टक्के

राज्यात शनिवारी 11 हजार 416 नवीन रुग्ण आढळले. तर 308 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे 26 हजार 440 लोक बरे होऊन घरी गेले. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 15 लाख 17 हजार 434 झाली आहे. तर एकूण मृतांचा आकडा 40 हजार 40 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 12 लाख 55 हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. राज्यात सध्या 2 लाख 21 हजार 156 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सध्या 22 लाख 68 हजार 057 जण होम क्वारांटाईन तर 24 हजार 994 लोक संस्थात्मक क्वारटाईनमध्ये आहेत. राज्याचा कोरोनामुक्तीचा दर 82.76 टक्के तर मृत्युदर 2.64 टक्के एवढा आहे.