आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात रविवारी 10 हजार 427 रुग्णांची वाढ, 300 मृत्यू: एकूण रुग्णसंख्या 15.27 लाख

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात रविवारी 10 हजार 427 रुग्णांची वाढ, 300 मृत्यू: एकूण रुग्णसंख्या 15.27 लाख

राज्यात रविवारी 10 हजार 427 नवीन रुग्णांचे निदान झाले. 300 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे 10 हजार 217 जण बरे होऊन घरी परतले. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 15 लाख 27 हजार 861 झाली आहे. यातील 2 लाख 21 हजार 62 रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत 12 लाख 65 हजार 996 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 40 हजार 340 रुग्णांचा मृत्यू झाला.

मागील 4 आठवड्यातील रुग्णसंख्येचे विश्लेषण केले असता दर आठवड्याला नव्याने आढळणारे बाधित रुग्ण कमी होताना दिसत आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात 1 लाख 53 हजार 331 एवढे नवे रुग्ण आढळले होते. त्यांची संख्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 92 हजार 246 एवढी आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत जवळपास 40 टक्के घट झाली आहे.