आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात सध्या 2 लाख 12 हजार 439 रुग्णांवर उपचार सुरू, आतापर्यंत 40 हजार 514 रुग्णांचा मृत्यू

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील कोरोनामुक्तीचे प्रमाण 83.49 टक्के एवढे आहे. तर मृत्यूदर 2.64 एवढा आहे.

राज्यात सोमवारी कोरोनाबाधितांची दिलासादायक आकेडवारी पाहायला मिळाली. नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात सोमवारी 7 हजार 89 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 169 जणांचा मृत्यू झाला. यासोबत एकूण रुग्णसंख्या 15 लाख 35 हजार 315 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 15 हजार 656 रुग्णांनी डिस्चार्ज देण्यात आला. यासोबत आतापर्यंत एकूण 12 लाख 81 हजार 896 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 12 हजार 439 रुग्णांवर उपचार सुरू आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 40 हजार 514 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोनामुक्तीचे प्रमाण 83.49 टक्के एवढे आहे. तर मृत्यूदर 2.64 एवढा आहे.